Pandharinatha Kakad Aarti
भक्तीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती
पंचप्राण जीवें भावें ओवाळूं आरती
ओंवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा माझ्या साईनाथा
दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेविला माथा
काय महिमा वर्णूं आतां सांगणे किती
कोटी ब्रहमहत्या मुख पाहतां जाती
राही रखुमाबाई उभ्या दोघी दो बाहीं
मयूरपिच्छ चामरें ढाळिति ठायींचे ठायीं
तुका म्हणे दीप घेउनि उन्मनीत शोभा
विठेवरी उभा दिसे लावण्यगाभा