Utha Panduranga - Kakad Aarti
उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला
वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला
गरुडपारांपासूनि महाद्वारापर्यंत
सुरवरांची मांदी उभे जोडूनि हात
शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी
त्रिशूळ डमरू घेऊनि उभा गिरजेचा पती
कलीयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनीं
पाठीमागे उभी डोळा झांकुनि जनी