Jai Jai Satchitswarupa Aarti
जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया
अवतरलासी भूवर जड मुढ ताराया
जयदेव जयदेव
जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया
अवतरलासी भूवर जड मुढ ताराया
जयदेव जयदेव
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी
स्थिरचर व्यापून उरलें जे या जगताशी
तें तूं तत्त्व खरोखर निःसंशय अससी
लीलामात्रें धरिलें मानव देहासी
जयदेव जयदेव
जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया
अवतरलासी भूवर जड मुढ ताराया
जयदेव जयदेव
होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा
करूनी गणि गण गणांत बोते या भजना
धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना
जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना
जयदेव जयदेव
जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया
अवतरलासी भूवर जड मुढ ताराया
जयदेव जयदेव
लीला अनंत केल्या बंकट सदनास
पेटविलें त्या अग्नीवाचूनी चिलमेस
क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश
जयदेव जयदेव
जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया
अवतरलासी भूवर जड मुढ ताराया
जयदेव जयदेव
व्याधी वारून केलें कैकां संपन्न
करविले भक्तालागी विठ्ठल दर्शन
भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन
जयदेव जयदेव
जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया
अवतरलासी भूवर जड मुढ ताराया
जयदेव जयदेव