Sajiri Gogiri

Sanjay Navgire

दारी सडा सारवण
गेलं अंगण सजून
दिन आला सुनियाचा
सूर सनई सुराचा
वली पिवळी हळद
आली गुलाबी गडद
ऐशा सण सोहळाच्या
चला ओटी तिची भर
देवा बामन साक्षीने
तिची पाठवणी करा
साजिरी गोजिरी
चंचल हरिणी
अल्लड जाळ्याची बावर नवरी
अल्लड जाळ्याची बावर नवरी

रानी वनी घरी दारी
तुझ्या अंगणाची परी
दुडूदुडू धावताना तुला वेड लावताना
काळजात जपलेली तीला पापण्यांच्या झुला
आठव उरात तुझा आठवांचा दाटलेला

तरली अशी कशी दुनिया जरा क्षणाची
आज सोबतीस यावी माय अंगणाची
साजिरी गोजिरी
चंचल हरिणी
अल्लड जाळ्याची बावर नवरी
अल्लड जाळ्याची बावर नवरी

ताटातूट काळजाची झाली परकी पाहुनी
यावी रोज ती दिवाळी अन रोज ववनानी
तुझा रुसवा फुगवा दोऱ्या घडीचा भांडण
जाता सासरी सोबत तुला मायेची गुंफण

साजिरी गोजिरी
चंचल हरिणी
अल्लड जाळ्याची बावर नवरी
साजिरी गोजिरी
चंचल हरिणी
अल्लड जाळ्याची बावर नवरी
अल्लड जाळ्याची बावर नवरी

Chansons les plus populaires [artist_preposition] बेला शेंडे

Autres artistes de Film score