Uttung Aamuchi

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू

परक्यांचा येता हल्ला प्रत्येक घर बने किल्ला
परक्यांचा येता हल्ला प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड होतील इथे ध्वजदंड
हे कोटि कोटि भुजदंड होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल
छातीची करुनी ढाल लाल त्या संगिनीस भिडवू
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू

बलवंत उभा हिमवंत करि हैवानांचा अंत
बलवंत उभा हिमवंत करि हैवानांचा अंत
हा धवलगिरी हा नंगा हा त्रिशूळ कांचनगंगा
हा धवलगिरी हा नंगा हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली खिंड खिंड अडवू
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू

देशाचा दृढ निर्धार करु प्राणपणे प्रतिकार
देशाचा दृढ निर्धार करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त जाळील आसुरी तख्त
ह्या नसानसांतिल रक्त जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास
आम्ही न कुणाचे दास नवा इतिहास पुन्हा घडवू
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू

Chansons les plus populaires [artist_preposition] पं. हृदयनाथ मंगेशकर

Autres artistes de