Raat Bhar

Vaibhav Joshi

हम्म हम्म हे ये हे
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंद रात भर
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंद रात भर
पुन्हा पुन्हा तुझी फुले
पुन्हा पुन्हा तुझी फुले
तुझाच गंध रात भर रात भर
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंद रात भर

अशी हवी तशी हवा
असा हवा तसा प्रहर
अशी हवी तशी हवा
असा हवा तसा प्रहर
निवांत रात वादते तुला मला नवा बहर
नभात चंद्र हि आता
नभात चंद्र हि आता जळेल मंद रात भर
रात भर रात भर
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंद रात भर

अजून स्पर्श राहिले
अजून प्रवास लांबला
पहाटच्या दवांसावे
टिपून घे पुन्हा मला
तुझी तहान आणि मी तुझ्यात धुंद रात भर
रात भर
रात भर
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंद रात भर

Chansons les plus populaires [artist_preposition] हृषिकेश रानडे

Autres artistes de Film score