Shri Dattachi Aarti
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा
नेती नेती शब्द न ये अनुमान
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना
जय देव जय देव
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता
जय देव जय देव
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त
अभाग्यासी कैची कळेल हि मात
पराही परतली तेथे कैचा हेत
जन्ममरणाचाही पुरलासे अंत
जय देव जय देव
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता
जय देव जय देव
दत्त येऊनिया ऊभा ठाकला
सदभावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकवीला
जय देव जय देव
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता
जय देव जय देव
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मी तू पणाची झाली बोलवण
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान
जय देव जय देव
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता हो स्वामी अवधूता
आरती ओवाळिता हरली भवचिंता
जय देव जय देव