Dahavis Asati Ka Re
Snehal Bhatkar, G D Madgulkar
दहा वीस असती का रे
मने उद्धवा
दहा वीस असती का रे
मने उद्धवा
एक मात्र होते ते मी
दिले माधवा
दिले माधवा
दहा वीस असती का रे
मने उद्धवा
पाच इंद्रियांचा मेळा
दास त्या मनाचा
तनु-मना एकच माझ्या
ध्यास मोहूनाचा
ध्यास मोहूनाचा
कुणीतरी मेघःश्यामा
इथे आणवा
इथे आणवा
दहा वीस असती का रे
मने उद्धवा
नसे देव ठावा मजला
राव द्वारकेचा
नसे देव ठावा मजला
राव द्वारकेचा
बाळकृष्ण ओळखते मी
सखा राधिकेचा
फेर धरा यमुनातिरी
गोप नाचवा
गोप नाचवा
दहा वीस असती का रे
मने उद्धवा
एक स्पर्श व्हावा
यावा वास कस्तुरीचा
एक हाक द्यावी प्यावा
सूर बासरीचा
लोचनांस माझ्या यावा
पूर आसवा
पूर आसवा
दहा वीस असती का रे
मने उद्धवा