Kadhi Na Kadhi

कधी ना कधी कधी ना कधी
कधी ना कधी कधी ना कधी
कधी ना कधी कधी ना कधी
मी दूर दूर जाताना इतकेच मनाशी वाटे
अनोळखी या वळणावर जुळून यावे हे नाते
हा काळोखाचा पदर होईल कधीतरी दूर
स्वप्नांच्या गावी येईल मग आठवणींचा पूर
समजावतो मी या मना
कधी ना कधी कधी ना कधी
कधी ना कधी कधी ना कधी
कधी ना कधी कधी ना कधी

वाटा या बंद सार्‍या आसवांना नसे किनारा
ये तू घेऊन आता वादळाचा आवेग सारा
मग विरून जाईल अंतर अन् फुटेल सगळा बांध
कोसळत्या दोन मनांचा जुळेल रेशीम बंध
आठवेल सारे बघ तुला
कधी ना कधी कधी ना कधी
कधी ना कधी कधी ना कधी
कधी ना कधी कधी ना कधी

राती सुन्या सुन्या ह्या दिवसजाळी क्षणाक्षणांना
हाती तुझ्याच आहे मोडलेला हा निवारा
कुठल्याश्या एका वेळी बस वळून पहा तू मागे
दिसतील तुला तेव्हा हे वाटेवर डोळे माझे
परतून येशी तू पुन्हा
कधी ना कधी कधी ना कधी
कधी ना कधी कधी ना कधी
कधी ना कधी कधी ना कधी

Chansons les plus populaires [artist_preposition] स्वप्निल बांदोडकर

Autres artistes de Traditional music