Savali

सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मानी
थेंब अलवार तू दवाचा
अबोली फुलांमध्ये तशी तू माझ्या मनी
मोह बेधुंद तू मनाचा
विखरून चांद रात काळजात
माझिया मोह रे चेहरा तुझा
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा

ही सांज या तारकांची
हॄदयी नक्षी तुझ्या रूपाची
टपटपतो मनी तुझाच मोगरा
तुझियासाठी होइ जीव बावरा
विसरून या जगास आसपास
मी तुझ्या वाटतो आसरा तुझा
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा

झुरतो झुलतो सदा थरारे
जीव हा माझा तुला पुकारे
ये दाटुनी ओथंबुनी
वीरही सरही या जीवनी
भिजवून जा अशीच जीवनास माझिया
लागूदे तुझी तृषा
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा

Chansons les plus populaires [artist_preposition] स्वप्निल बांदोडकर

Autres artistes de Traditional music