Tichya Dolyatala Gaav

तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव

त्या गावाच्या वाटा साऱ्या मोहरलेल्या
तारुण्याच्या उंबरठ्याशी हुरहूरलेल्या
त्या गावाच्या वाटा साऱ्या मोहरलेल्या
तारुण्याच्या उंबरठ्याशी हुरहूरलेल्या
पण नसतो सहजी पत्ता गवस तयांचा
भाग्यानेच कधी ये उमटुनी मनी नकाशा
शंभर मरणांच्या बोलीवर मिळतो याचा ठाव
तिच्या डोळ्यातलं गांव
तिच्या डोळ्यातलं गांव
तिच्या डोळ्यातलं गांव

मोर पिसाच्या विमानातुनी इथे यायचे
आणि कळ्यांच्या पायघड्यांवर उतरायाचे
मोर पिसाच्या विमानातुनी इथे यायचे
आणि कळ्यांच्या पायघड्यांवर उतरायाचे
पाऊल टाका सावध येथे अगणित चकवे
गाव असे डोळ्यांतून मोहक मनात फसवे
प्रवेश केवळ त्यांना झेलीती जे प्राणावरती घाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
हो हो हां हां हां हां हां
छाया नाही उन्ह ही नाही हवा सावळी
वाऱ्यावरती सारंगाची धून कोवळी
छाया नाही उन्ह ही नाही हवा सावळी
वाऱ्यावरती सारंगाची धून कोवळी
संथ धुके अंगाला बिलगून चालत असते
अन पक्षाचे हळवे अलगुज वाजत असते
झऱ्या-झऱ्या परी सजल सहजसा होऊन जात स्वभाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव

Chansons les plus populaires [artist_preposition] स्वप्निल बांदोडकर

Autres artistes de Traditional music