Nana Parimal Durva Ganesh Aarti
नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें
लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें
ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे
अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती
त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती
सर्वहि पावती अंती भवसागर तरती
शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी
कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि
त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी
गोसावीनंदन रत नामस्मरणी
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती