Naki Doli Neet
नाकी डोळी नीट डाव्या गालावर तीट
नाकी डोळी नीट डाव्या गालावर तीट
केसांची बट जिथं खुलायची पुरषांची जात तिथं फसायची
केसांची बट जिथं खुलायची पुरषांची जात तिथं फसायची
रंगमहालाचा हिरवा रंग खुलवितो प्रीती तो रंग प्रीती तो रंग
घ्यावा अनुभव बसून संग
घ्यावा अनुभव बसून संग
आ आ आ आ
पडली हवा थंडगार
पडली हवा थंडगार अंगी झोंबतो शहार
पडली हवा थंडगार अंगी झोंबतो शहार
दिव्यातली वात जिथं विझायची पुरषांची जात तिथं फसायची
आ आ ओ ओ
कधी रागाचा नकार लटका गोर्या मानेस मोहक झटका
जाईल उडून डोईचा जरीपटका
तिकडं दावुनिया हुल
तिकडं दावुनिया हुल इकडं पाडेल भूल
तिकडं दावुनिया हुल इकडं पाडेल भूल
लढत गनिमी काव्याची पुरषांची जात तिथं फसायची
मुखी विडा रंगला केशरी श्वासांत मिसळली कस्तुरी
मुखी विडा रंगला केशरी
एक दोन तीन चार वाजे तुणतुण्याची तार
मुजर्याला मान जिथे लवायची पुरषांची जात तिथं फसायची
मुजर्याला मान जिथे लवायची पुरषांची जात तिथं फसायची
नाकी डोळी नीट डाव्या गालावर तीट
केसांची बट जिथं खुलायची पुरषांची जात तिथं फसायची
बाई पुरषांची जात तिथं फसायची