Olakh Pahili Gaali Haste

P Savlaram

आ आ आ आ
ओळख पहिली गाली हसते
ओळख पहिली गाली हसते
सांग दर्पणा कशी मी दिसते
कशी मी दिसते
ओळख पहिली गाली हसते
आषाडीच्या तिन्ही सांजेला
पैलतिरी त्या पाणवठ्याला
आषाडीच्या तिन्ही सांजेला
पैलतिरी त्या पाणवठ्याला
बघुनी ज्याला जीव लाजला
बघुनी ज्याला जीव लाजला
आठवण त्याची हृदयी ठसते
हृदयी ठसते
ओळख पहिली गाली हसते
ओळख पहिली गाली हसते

नाव जायचे घुमता कानी
नाव जायचे घुमता कानी
चित्र रंगते मिटल्या नयनी
चित्र रंगते मिटल्या नयनी
बाहुपाशी जाता विरूनी
बाहुपाशी जाता विरूनी
माझ्यावर मी जेव्हा रुसते
जेव्हा रुसते
ओळख पहिली गाली हसते
ओळख पहिली गाली हसते

करी बांगडी राजवारखी
नथनी बुगडी तुझ्यासारखी
करी बांगडी राजवारखी
नथनी बुगडी तुझ्यासारखी
तुझ्यापरी तो रत्नपारखी
तुझ्यापरी तो रत्नपारखी
म्हणुनी तुजला घडी घडी पुसते
घडी घडी पुसते
ओळख पहिली गाली हसते
ओळख पहिली गाली हसते
सांग दर्पणा कशी मी दिसते
कशी मी दिसते
ओळख पहिली गाली हसते

Curiosités sur la chanson Olakh Pahili Gaali Haste de Asha Bhosle

Qui a composé la chanson “Olakh Pahili Gaali Haste” de Asha Bhosle?
La chanson “Olakh Pahili Gaali Haste” de Asha Bhosle a été composée par P Savlaram.

Chansons les plus populaires [artist_preposition] Asha Bhosle

Autres artistes de Pop rock