Path Shiva Ho Path Shiva
पाठ शिवा हो पाठ शिवा
पाठ शिवा हो पाठ शिवा
तारुण्यातही बाळपणाचा खेळ वाटतो हवा हवा
तारुण्यातही बाळपणाचा खेळ वाटतो हवा हवा हवा हवा
पाठ शिवा हो पाठ शिवा
पाठ शिवा हो पाठ शिवा
बन केळीचे हरित सापळे लपायास मज असे मोकळे
प्रणयांधाला काय साजणी शिवाशिवीचा खेळ नवा
हा हा पाठ शिवा हो पाठ शिवा
पाठ शिवा हो पाठ शिवा
नूपुर विरहित जरि तव पाऊल अचुक मला पण लागे चाहूल
नूपुर विरहित जरि तव पाऊल अचुक मला पण लागे चाहूल
कानांनाही फुटते दृष्टी तुझ्या ऐकता पायरवा
हा हा कानांनाही फुटते दृष्टी तुझ्या ऐकता पायरवा
हा पाठ शिवा हो पाठ शिवा
पाठ शिवा हो पाठ शिवा
सावली होशिल परि कशाची आ आ आ आ आ
सावली होशिल परि कशाची
तुझ्या रूपाची तुझ्या यशाची
ओ ओ तुझ्या रूपाची तुझ्या यशाची
पाठलाग मग कुठे संभवे दोन जिवांचा जडे दुवा
पाठ शिवा हो पाठ शिवा
पाठ शिवा हो पाठ शिवा
तारुण्यातही बाळपणाचा खेळ वाटतो हवा हवा
हो हो हो तारुण्यातही बाळपणाचा खेळ वाटतो हवा हवा हवा हवा
पाठ शिवा हो पाठ शिवा
पाठ शिवा हो पाठ शिवा