Priya Tuj Kaay Dise
प्रिया तुज काय दिसे स्वप्नात
प्रिया तुज काय दिसे स्वप्नात
आनंदाचे पाझर थटले
आनंदाचे पाझर थटले मिटलेल्या नयनांत
प्रिया तुज काय दिसे स्वप्नात
प्रिया तुज काय दिसे स्वप्नात
मनासारखी मिळे सहचरी
मनासारखी मिळे सहचरी
फुलून दरवळे सुख संसारी
फुलून दरवळे सुख संसारी
नकळे केव्हा येतीजाती दिवस आणखी रात
प्रिया तुज काय दिसे स्वप्नात
प्रिया तुज काय दिसे स्वप्नात
तुला न उरली तुझी आठवण
तुला न उरली तुझी आठवण
मी तर झाले तुला समर्पण
मी तर झाले तुला समर्पण
दुजेपणाचे नाव न उरले दोघांच्या जगतात
प्रिया तुज काय दिसे स्वप्नात
प्रिया तुज काय दिसे स्वप्नात
मोहरलेल्या या ऐक्यावर
मोहरलेल्या या ऐक्यावर
एक होतसे नवखी थरथर
एक होतसे नवखी थरथर
दिसण्यावाचून जाणवते मज नवल आतल्या आत
प्रिया तुज काय दिसे स्वप्नात
प्रिया तुज काय दिसे स्वप्नात