Uoon Aso Va Aso Savali
ऊन असो वा असो सावली
ऊन असो वा असो सावली
काटे अथवा फुले असू दे
ऊन असो वा असो सावली
या वाटेवर तुझ्या संगती
या वाटेवर तुझ्या संगती
जीव जडवुनी मला हसू दे
ऊन असो वा असो सावली
कधी निराशा खिन्न दाटली
कधी निराशा खिन्न दाटली
कधी भोवती रान पेटले
परि अचानक वळणावरती
निळेनिळे चांदणे भेटले
निळेनिळे चांदणे भेटले
गुज मनातिल सांगत तुजला
चांदण्यात या मला बसू दे
चांदण्यात या मला बसू दे
या वाटेवर तुझ्या संगती
या वाटेवर तुझ्या संगती
जीव जडवुनी मला हसू दे
ऊन असो वा असो सावली
कळी एकदा रुसुन म्हणाली
कळी एकदा रुसुन म्हणाली
नाही मी भुलाणारच नाही
नाही मी भुलाणारच नाही
किती जरी केलीस आर्जवे
तरीही मी फुलणारच नाही
तरीही मी फुलणारच नाही
फुलून आली कधी न कळले
तशी लाजरी पुन्हा रुसू दे
तशी लाजरी पुन्हा रुसू दे
या वाटेवर तुझ्या संगती
या वाटेवर तुझ्या संगती
जीव जडवुनी मला हसू दे
ऊन असो वा असो सावली
सांजघनाचा सोनकेवडा
सांजघनाचा सोनकेवडा
भिजवित आली ही हळवी सर
भिजवित आली ही हळवी सर
तुझ्या नि माझ्या भवतीचे जग
तुझ्या नि माझ्या भवतीचे जग
स्वप्नापरी हे झाले धूसर
स्वप्नापरी हे झाले धूसर
तुला बिलगुनी चिंब भिजू दे
तुला बिलगुनी चिंब भिजू दे
असे अनावर सुख बरसू दे
असे अनावर सुख बरसू दे
या वाटेवर तुझ्या संगती
या वाटेवर तुझ्या संगती(या वाटेवर तुझ्या संगती)
जीव जडवुनी मला हसू दे(जीव जडवुनी मला हसू दे)
ऊन असो वा असो सावली(ऊन असो वा असो सावली)
ऊन असो वा असो सावली(ऊन असो वा असो सावली)