Vithal Rakhumai Pari

Vasant Prabhu, P Savalaram

विठ्ठल रखुमाईपरी
विठ्ठल रखुमाईपरी
आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी
कशाला जाऊ मी पंढरपुरी
कशाला जाऊ मी पंढरपुरी

कैलासाहून थोर मन हे माझ्या बाबांचे
कैलासाहून थोर मन हे माझ्या बाबांचे
शंकराला विष न पचले प्रपंच दु:खाचे
पचवुन देती अमृत मजला संत वचनांचे
पुंडलिकापरी हात जोडुनी सदैव सामोरी
कशाला जाऊ मी पंढरपुरी

सात समिंदर भरूनी उरली माया आईची
सात समिंदर भरूनी उरली माया आईची
प्रेमळतेला उपमा नाही वाणी ज्ञानेशाची
मंगल शोभा जिच्या ललाटी कोटी चंद्राची
वत्सलमूर्ति माय माउली मानस देव्हारी
कशाला जाऊ मी पंढरपुरी

विटेवरचे जगजेठी हे
विटेवरचे जगजेठी हे आले माझ्यासाठी हो हो
विटेवरचे जगजेठी हे आले माझ्यासाठी
संसाराचा थाट मांडुनी केली मजला मोठी
करपुष्पांची माला घालुन तुमच्या मी कंठी
चरणांचे हे तीर्थ घेते चंद्रभागेपरी
कशाला जाऊ मी पंढरपुरी
कशाला जाऊ मी पंढरपुरी

Curiosités sur la chanson Vithal Rakhumai Pari de Asha Bhosle

Qui a composé la chanson “Vithal Rakhumai Pari” de Asha Bhosle?
La chanson “Vithal Rakhumai Pari” de Asha Bhosle a été composée par Vasant Prabhu, P Savalaram.

Chansons les plus populaires [artist_preposition] Asha Bhosle

Autres artistes de Pop rock