Gol Gol Ek Paisa [Happy]
Mangesh Kangane
पोराना पार्टी पोरींचे लाड
भाऊचा मालदार जिगरा..
फ्याशन भडक रोज कॉलर कडक
गावात मानपान जबरा
पोरींची पयली रं चॉइस हाय
दिलदार दिल्लाचा हँडसम दादला...
गोल गोल गोल गोल एक पैसा
कलेक्टर भाऊच्या मुंह जैसा...
अंतरा : १
नाचकाम धुमशान जोरात हाय
जीवाला रातभर बिरेक नाय
हुल्लड धिंगाना करायचा हाय
भाऊची पार्टी झक्कास हाय
लायटिंग लावलीय झगामगा
होऊदे तोटा भाऊ आहे मोठा...
गोल गोल गोल गोल एक पैसा
कलेक्टर भाऊच्या मुंह जैसा... ||१||
अंतरा : २
ए बँडवाल्या दादा दाकीव थरार
लागू दे अंगाला घामाची धार
टायमिंगचा मोजमाप कश्शाला यार
आत्ताशी वाजलेत सक्काळचे चार
आरं हालूदे धरती डगामगा
वाजूदे बाजा भाऊ हाय राजा
गोल गोल गोल गोल एक पैसा
कलेक्टर भाऊच्या मुंह जैसा... ||२||