Ha Daivagaticha Phera
ज्या झाडांनी दिली सावली
त्यांना नाही छाया
वात्स्ल्याच्या उन्हांत जळते
ओली ममता माया
हा दैवगतीचा फेरा
हा दैवगतीचा फेरा
कलीयुगी या उलटा सुलटा
खेळ असे हा सारा
हा दैवगतीचा फेरा
हा दैवगतीचा फेरा
तळहाती जपले ज्याला
का भूल पडावी त्याला
देव्हार्यातील दैवत घेई
वळचणीस का थारा
खेळ असे हा सारा
हा दैवगतीचा फेरा
हा दैवगतीचा फेरा
कष्टाचे डोंगर पुढती
ही गतजन्मींची झडती
शरीर थकले तरी शिरावर
आयुष्याच्या धारा
खेळ असे हा सारा
हा दैवगतीचा फेरा
हा दैवगतीचा फेरा
स्वप्नांना गहिवर फुटला
की काळीज धागा तुटला
अमृत ज्यांनी दिले तयांच्या
नयनी अश्रृधारा
खेळ असे हा सारा
हा दैवगतीचा फेरा
हा दैवगतीचा फेरा