Sakhya Re Ghayal Mee Harini
BHASKAR CHANDAVARKAR, JAGDISH KHEBUDKAR
सख्या रे सख्या रे
सख्या रे घायाळ मी हरिणी
सख्या रे घायाळ मी हरिणी
काजळ काळी गर्द रात अन
कंप कंप अंगात
सळ सळनाऱ्या पानांना ही
रात किड्यांची साथ
कुठ लपू मीकशी लपू मी
गेले भांबावूनी भांबावूनी भांबावूनी
सख्या रे सख्या रे
सख्या रे घायाळ मी हरिणी
सख्या रे घायाळ मी हरिणी
गुपित उमटले चेहऱ्यावरती
भाव आगळे डोळ्यात
पाश गुंतले नियतीचे रे
तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठ पळू मी कुठ पळू मी
गेले मी हरवूनी मी हरवूनी मी हरवूनी
सख्या रे सख्या रे
सख्या रे घायाळ मी हरिणी
सख्या रे घायाळ मी हरिणी