O Saathi Re [Female Version]
Mandar Cholkar
नकळत निसटून जाते
हातून जे काही
मिळते का रे कुणा
उसवून धागे सारे
विरले जे काही
सलते का रे तुला
जरी प्रवास हा तुझा उन्हातला
असेल सावली तुझी मी साथीला
चाहूल हि आहे नवी
तू साद दे ओ साथी रे
स्वप्नातल्या ह्या प्रेमास रे
तू नाव दे ओ साथी रे
अंधाराल्या दिशा जरी
ताऱ्यातुनी दिसेन मी
अनोळखी वाटेवरी
तुझ्या सवे असेन मी
जरी फितूर वागणे किनाऱ्याला
तरी कवेत घेतले मी वाऱ्याला
चाहूल हि आहे नवी
तू साद दे ओ साथी रे
स्वप्नातल्या ह्या प्रेमास रे
तू नाव दे ओ साथी रे
सांगायचे जे राहिले
बोलू जरा नझरेतुनी
बरसेलरे आभाळ ते
जे दाटले होते मनी
जरी क्षणांत बंध वाहुनी गेला
तरी फिरून चांद येइ भेटीला आ
चाहूल हि आहे नवी
तू साद दे ओ साथी रे
स्वप्नातल्या ह्या प्रेमास रे
तू नाव दे ओ साथी रे