To Mhanala Ekda

तो म्हणाला एकदा मेघ बोलावा जसा
मी तुझा प्रारंभ आणि मीच आहे सांगता
तो म्हणाला एकदा मेघ बोलावा जसा
मी तुझा प्रारंभ आणि मीच आहे सांगता
तो म्हणाला एकदा

तो थरारून एकदा हो उन्हातील आरसा
तो थरारून एकदा हो उन्हातील आरसा
अजून मी सांभाळते तो कोंदलेला कवडसा
अजून मी सांभाळते तो कोंदलेला कवडसा
तो कोंदलेला कवडसा
तो म्हणाला एकदा मेघ बोलावा जसा
मी तुझा प्रारंभ आणि मीच आहे सांगता
तो म्हणाला एकदा

तो उसासून एकदा गात असे वेणू जसा
तो उसासून एकदा गात असे वेणू जसा
नांदते प्राणात तेव्हा पश्चिमेची स्तब्धता
नांदते प्राणात तेव्हा पश्चिमेची स्तब्धता
पश्चिमेची स्तब्धता
तो म्हणाला एकदा मेघ बोलावा जसा
मी तुझा प्रारंभ आणि मीच आहे सांगता
तो म्हणाला एकदा

तो असा अन एकदा तो कसा अन कैकदा
तो असा अन एकदा तो कसा अन कैकदा
तोच माझी गहनता अन थांग ही माझ्यातला
तोच माझी गहनता अन थांग ही माझ्यातला
थांग ही माझ्यातला
तो म्हणाला एकदा मेघ बोलावा जसा
मी तुझा प्रारंभ आणि मीच आहे सांगता
तो म्हणाला एकदा मेघ बोलावा जसा
मी तुझा प्रारंभ आणि मीच आहे सांगता
तो म्हणाला एकदा

Chansons les plus populaires [artist_preposition] बेला शेंडे

Autres artistes de Film score