Sairat Jhala Ji

Ajay, Atul

अलगुज वाजं नभात
भलतंच झालंया आज
अलगद आली मनात
पहीलीच तरनी ही लाज
हो आगं झनानलं काळजामंदी
आन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी
सैराट झालं जी
सैराट झालं जी
हं बदलून गेलंया सारं
पिरतीचं सुटलंया वारं वारं वारं
अल्लड भांबावल्यालं
बिल्लोरी पाखरु न्यारं
आलं मनातलं
ह्या व्हटामंदी
आन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी
सैराट झालं जी
सैराट झालं जी

हं कवळ्यापनात ह्या
सावळ्या उन्हात ह्या
बावळ्या मनात ह्या भरलं(भरलं)
तुझं गाणं मनामंदी
घुमतयं कानामंदी
सुर सनईचं राया सजलं
हेऽऽ सजलं, ऊनवारं नभतारं सजलं
रंगलं मन हळदीनं रानी रंगलं
सरलं ह्ये जगण्याचं झुरणं सरलं
भिनलं नजरानं इश जहरी भिनलं
आगं धडाडलं
ह्या नभामंदी
आन् ढोलासंगं गात आलं जी
सैराट झालं जी
सैराट झालं जी
सैराट झालं जी

हंऽऽ आकरीत घडलंया
सपान ह्ये पडलंया
गळ्यामंदी सजलंया डोरलं (डोरलं)
साताजल्माचं नात
रुजलंया काळजात
तुला रं देवागतं पुजलं
हे रुजलं, बीज पिरतीचं सजनी रुजलं
भिजलं मन पिरमानं पुरतं भिजलं
सरलं मन मारुन जगनं सरलं
हरलं ह्या पिरमाला समदं हरलं
आगं कडाडलं
पावसामंदी
अन् आभाळाला याद आलं जी

Chansons les plus populaires [artist_preposition] अजय गोगवले

Autres artistes de Film score