Michi Mazavyalo
Kshitij Patwardhan
सावलीची आस ना कोवळेसे ऊन मी
सूर नाही संगती एक तरीही धून मी
ज्यात डोकावेन मी ते मनाचे बिंब मी
जन्म हेलावेल हा ते उसासे चिंब मी
नाव नाही ज्यास काही तो अनोखा रंग मी
जो पुरेल जन्म सारा तो सोबतीचा चंग मी
मीची मझ व्यालो पोटा आपुलिया आलो
मीची मझ व्यालो पोटा आपुलिया आलो
मीची मझ व्यालो पोटा आपुलिया आलो
काळजात करुणेचा उसळलेला डोंब मी
हर क्षणाला कल्पनेचा जन्मलेला कोंब मी
शोधताना वाट माझी होत माझा त्रास मी
मोजताना श्वास माझे अंतरीचे हास्य मी
मीची मझ व्यालो पोटा आपुलिया आलो
मीची मझ व्यालो पोटा आपुलिया आलो
मीची मझ व्यालो पोटा आपुलिया आलो
दोन्हीकडे पाहे तुका आहे तैसा आहे
दोन्हीकडे पाहे तुका आहे तैसा आहे
तुका आ आ आ आ आ आ आ