Kadal Sneham Mohabbat
कादल स्नेहम मोहब्बत
प्रेम लव भालोबाशा
हा साऱ्या शब्दाचा खेळ
खरी नजरेची भाषा
कोण म्हणतो की
ये इश्क़ नही
बिलकुल नही आसान
एका नजरेत हि जादुगरी
देते उरी दिलासा
कादल स्नेहम मोहब्बत
प्रेम लव भालोबाशा
सब सारा शब्दांचा खेळ
खरी नजरेची भाषा
रागे भरी भुवई जरी
हसुनी करी नजर तुझी का फिरी
ओठांवरी नको तरी
सांगे खरी कथा पापणी
का परी
चोरटी लाजरी
बोलकी सुरांपरी
हि नजर बेखबर
हिला नजर ना लागो
पापण्याच्या परी पिसा परी
उतरे कधी ह्या अलवार गालांवरी
तुझीया मुठी वरुनी नवी
उडूनी करी ती
स्वप्ने मनीची खरी
काळजाची सखी
हि मुठी मन मिठी
हि नजर बी खबर
हिला नजर ना लागो
कादल स्नेहम मोहब्बत
प्रेम लव भालोबाशा
हा साऱ्या शब्दाचा खेळ
खरी नजरेची भाषा
कोण म्हणतो की
ये इश्क़ नही
बिलकुल नही आसान
एका नजरेत हि
जादुगरी देते उरी दिलासा