Tuch Re Kinara
शब्दातल्या अर्थामधे
अर्थातल्या भावामधे
स्वछंद या श्वासामधे
जशी तू माझ्यामधे
आभास या भासामधे
निस्वार्थ या ध्यासामधे
स्वछंद या श्वासामधे
जशी तू माझ्यामधे
ना उमगला ना समजला
ना गवसला तू
मी चंद्रमा मी पौर्णिमा
मी चांदण्या ब्रह्मांड तू
तूच रे किनारा
तूच रे निवारा
तूच रे किनारा
तूच रे निवारा ओ
वेदना दुःखातली
संवेदना स्पर्शातली
हा गोडवा स्वप्नातला
हा मारवा गीतातला
वेदना दुःखातली
संवेदना स्पर्शातली
हा गोडवा स्वप्नातला
हा मारवा गीतातला
श्वासातले ध्यासातले
स्वप्नातले सत्य तू
मी चंद्रमा मी पौर्णिमा
मी चांदण्या ब्रह्मांड तू
तूच रे किनारा
तूच रे निवारा
तूच रे किनारा
तूच रे निवारा ओ
विरह ह्या प्रेमातला
अंकुर हा भेदातला
ही पानगळ वाऱ्यातली
ही सावली उन्हातली
विरह ह्या प्रेमातला
अंकुर हा भेदातला
ही पानगळ वाऱ्यातली
ही सावली उन्हातली
शोधू इथे शोधू तिथे
आहे कुठे सांग तू
मी चंद्रमा मी पौर्णिमा
मी चांदण्या ब्रह्मांड तू
तूच रे किनारा
तूच रे निवारा
तूच रे किनारा