Bhas Ha

Kedar Pandit

जरा अंथरू चांदण्याला
लपेटून घेऊ धुक्याला
वाटे मला काळ थांबला
भास हा हवा हवा
भास हा नवा नवा
भास हा

जरा अंथरू चांदण्याला
लपेटून घेऊ धुक्याला
वाटे मला काळ थांबला
भास हा हवा हवा
भास हा नवा नवा
भास हा

अलवार या नभाला जरा वाटे मिठीत घ्यावे
फसवुनी या वाऱ्यास अन् नदीच्या तळाशी लपावे
अलवार या नभाला जरा वाटे मिठीत घ्यावे
फसवुनी या वाऱ्यास अन् नदीच्या तळाशी लपावे
मनाशी पुन्हा पैज लावू
जगपासुनी दूर जाऊ
दोघेच जेथे असू सखे
भास हा हवा हवा
भास हा नवा नवा
भास हा

लालाला ला ला ला ला ला ला

झुळकेपरी बटांना तुझ्या हलकेच मी सावरावे
नाजुकशा ओठास ही उषेचे नवे रंग द्यावे
झुळकेपरी लालाला बटांना तुझ्या लालाला
हलकेच मी सावरावे लालाला
नाजुकशा ओठास ही उषेचे नवे रंग द्यावे

जणू लाट मी तू किनारा
जणू काठ झाला निवारा
श्वासात रे श्वास गुंतला
भास हा हवा हवा
भास हा नवा नवा
भास हा
जरा अंथरू चांदण्याला
लपेटून घेऊ धुक्याला
वाटे मला काळ थांबला
भास हा हवा हवा
भास हा नवा नवा
भास हा

Chansons les plus populaires [artist_preposition] केतकी माटेगावकर

Autres artistes de Film score