Isaq Jhala Ra

Viraj Daki

भिजल रान
भिजल रान
भिजल रान फुल पान पावसात न्हाल
अत्तर सांडलं वार्यामंदी घुसळल
पिसाटल येड मन मधात बुडाल
पिसाटल येड मन मधात बुडाल
इसक झालं र गड्या
इसक झालं र
इसक झालं र गड्या
इसक झालं र

रात दिस देवा म्होर साकडं घातलं
तुटलेल्या ताऱ्याकडे तुला मागेल
स्वर्ग तुझ्या मिठीचा एकदा मिळुदे
पिरतीच्या वनव्याने पार जळूदे
ध्यास लागला जीव जडला
अंतरात खोल
नशा तरी अशी कशी
सावरना तोल
नजरेचा तिर आरपार हो घुसल
नजरेचा तिर आरपार हो घुसल

इसक झालं र गड्या (इसक झालं र गड्या)
इसक झालं र (इसक झालं र)
इसक झालं र गड्या (इसक झालं र गड्या)
इसक झालं र (इसक झालं र)

थर थर वठ हातावर टेकल
कट्यावर काटा शाहर्यानी घेरलं
धड धड छताडच ढोल बडलं
जागपनी सपान हे गोड पडलं

रंग चढता कातरला भेटीची किनार
गोर्या मोहऱ्या गाला वर लाजेचा पदर
सोन झालं जिंदगीच सुख गवसलं
सोन झालं जिंदगीच सुख गवसलं
इसक झालं र गड्या
इसक झालं र
इसक झालं र गड्या
इसक झालं र

Chansons les plus populaires [artist_preposition] प्रियांका बर्वे

Autres artistes de Film score