Arun Ugawala Anuragacha
DASHRATH PUJARI, P. SAVALARAM
अरुण उगवला अनुरागाचा उजळत आभाळी
उषा प्रीतिची हासत लावी कुमकुम मंगल भाळी
अरुण उगवला आ आ आ
नेत्रकमळीचा भ्रमर उडाला मरंद उधळीत आ आ आ
खुळू लागला हर्ष सुगंधी पुष्पपाखळीत
घेतभरारी जीव पाखरे घेतभरारी जीव पाखरे
आळवित भूपाळी आळवित भूपाळी
अरुण उगवला आ आ आ
स्वर्गसुखाचा आज मोहरे कल्पतरू दारी आ आ आ
स्वर्गसुखाचा आज मोहरे कल्पतरू दारी
तुळस मंजिरी दळू लागली रामाच्या प्रहरी
जोडुनी कर हे प्रीत सुवासीन
जोडुनी कर हे प्रीत सुवासीन
प्रदक्षिणा घाली प्रदक्षिणा घाली
अरुण उगवला अनुरागाचा उजळत आभाळी
उषा प्रीतिची हासत लावी कुमकुम मंगल भाळी