Dinancha Kaiwari
दीनांचा कैवारी दु:खिता सोयरा
मुला माणसात माझा विठल साजिरा
मुला माणसात माझा विठल साजिरा
दीनांचा कैवारी दु:खिता सोयरा
मुला माणसात माझा विठल साजिरा
वेदनेत जन्मे हरी संकटात रांगे
दरिद्रयाच्या झोपडीत गीता नित्य सांगे
वेदनेत जन्मे हरी संकटात रांगे
दरिद्रयाच्या झोपडीत गीता नित्य सांगे
दलितांच्या माथा धरितो मायेचा पिसारा
मुला माणसात माझा विठल साजिरा
मुला माणसात माझा विठल साजिरा
शेतातल्या चिखलामध्ये उभा रे श्रीरंग
उभा रे श्रीरंग
घाम साचला निढळी भिजे त्याचे अंग
घाम साचला निढळी भिजे त्याचे अंग
ऊब देतो थंडीमाजी पिउनी निखारा
मुला माणसात माझा विठल साजिरा
मुला माणसात माझा विठल साजिरा
देव नाही राऊळात नाही त्या आकार
देव आहे तुमचा आमुचा मानवी आचार
तापलेल्या पाऊलांना होई जो आसरा
मुला माणसात माझा विठल साजिरा
दीनांचा कैवारी दु:खिता सोयरा
मुला माणसात माझा विठल साजिरा
मुला माणसात माझा विठल साजिरा