Hari Aala Ga

S.A. SHUKLA, YASHBANT DEO

लुटु लुटु धावत
खुदुखुदु हासत
लुटु लुटु धावत
खुदुखुदु हासत
हरी आला ग माझ्या अंगणी
हरी आला ग माझ्या अंगणी

रुणझुणतो वाळा
करी लाडिकचाळा
रुणझुणतो वाळा
करी लाडिकचाळा
नाचे कान्हा ग माझ्या अंगणी
हरी आला ग माझ्या अंगणी

जाई जुई फुलली जिवाची कळीकळी फुलली
बघ चिमण्या अधरी कशी ग बाई धरी चिमणी मुरली
बघ चिमण्या अधरी कशी ग बाई धरी चिमणी मुरली
हा ल्याला गोजिरवाणी नवलाईची लेणी
ल्याला गोजिरवाणी नवलाईची लेणी
नंदकिशोर आला अंगणी
हरी आला ग माझ्या अंगणी

बाल मुकुंद गुणी जणू सखे साजणी
बाल मुकुंद गुणी जणू सखे साजणी आ आ
जणू सखे साजणी बाल मुकुंद गुणी
जणू सखे साजणी बाल मुकुंद गुणी
जणू सखे साजणी ब्रह्म सानुले उभे अंगणी
हरी आला ग माझ्या अंगणी

लुटु लुटु धावत
खुदुखुदु हासत
लुटु लुटु धावत
खुदुखुदु हासत
हरी आला ग माझ्या अंगणी
हरी आला ग माझ्या अंगणी

Curiosités sur la chanson Hari Aala Ga de सुमन कल्याणपुर

Qui a composé la chanson “Hari Aala Ga” de सुमन कल्याणपुर?
La chanson “Hari Aala Ga” de सुमन कल्याणपुर a été composée par S.A. SHUKLA, YASHBANT DEO.

Chansons les plus populaires [artist_preposition] सुमन कल्याणपुर

Autres artistes de Traditional music