Julalya Surel Tara
Dashrath Pujari, Shrikant Purohit
जुळल्या सुरेल तारा स्मरते अजून नाते
डोळ्यात भाव माझे गाती तुझीच गीते
जुळल्या सुरेल तारा
स्वप्नांपरी अजून ते दिवस भासतात
सरती उजाड रात्री हळुवार गीत गात
तो काळ आठविता
तो काळआठविता नयनांत नीर दाटे
डोळ्यात भाव माझे गाती तुझीच गीते
जुळल्या सुरेल तारा
फिरलो मिळुन दोघे गुंफुन हात हाती
फुलले गुलाब गाली स्पर्शात धुंद प्रीती
त्या कोवव्व्या वयाला वरदान दिव्य होते
डोळ्यात भाव माझे गाती तुझीच गीते
जुळल्या सुरेल तारा
शब्दांत रंगविले मी भावस्वप्न भोळे
उरली न प्रीत अपुली हो बागही निराळे
त्या भाबड्या कविला गीतांत अर्घ्य देते
डोळ्यात भाव माझे गाती तुझीच गीते
जुळल्या सुरेल तारा