Pivli Pivli Halad Lagali
पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा
वधु लाजरी झालीस तू ग सांगे तो चौघडा
पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा
वधु लाजरी झालीस तू ग सांगे तो चौघडा
बाजुबंद त्या गोप पाटल्या बिलवर नक्षीदार
तुझ्या हळदी ग कुणी छेडिली रतिवीणेची तार
बाजुबंद त्या गोप पाटल्या बिलवर नक्षीदार
तुझ्या हळदी ग कुणी छेडिली रतिवीणेची तार
सांग कुणी ग अंगठीत या तांबुस दिधला खडा
वधु लाजरी झालीस तू ग सांगे तो चौघडा
मुंडावळी या भाळी दिसती काजळ नयनांगणी
करकमळापरी कुणी गुंफिले सुवासिनीचे मणी
मुंडावळी या भाळी दिसती काजळ नयनांगणी
करकमळापरी कुणी गुंफिले सुवासिनीचे मणी
आठवणीचा घेउन जा तू माहेराचा घडा
वधु लाजरी झालीस तू ग सांगे तो चौघडा
स्वप्नफुलांसह रमत रहा तू प्रेमळ संसारी
भाग्यवेल ती मोहरेल ग उद्या तुझ्या दारी
स्वप्नफुलांसह रमत रहा तू प्रेमळ संसारी
भाग्यवेल ती मोहरेल ग उद्या तुझ्या दारी
सौख्य पाहता भिजु दे माझ्या डोळ्याच्या या कडा
वधु लाजरी झालीस तू ग सांगे तो चौघडा