Aarti Ramdasachi

आरती रामदासा
आरती रामदासा
भक्त विरक्त ईशा
उगवला ज्ञानसूर्य
उजळोनी प्रकाशा
आरती रामदासा
आरती रामदासा
भक्त विरक्त ईशा
आरती रामदासा

साक्षात शंकराचा
अवतार मारुती
कलिमाजी तेचि झाली
रामदासाची मूर्ती
आरती रामदासा
आरती रामदासा
भक्त विरक्त ईशा
आरती रामदासा

वीसही दशकांचा
दासबोध ग्रंथ केला
जडजीवां उद्धरिले
नृप शिवासी तारीले
आरती रामदासा
आरती रामदासा
भक्त विरक्त ईशा
आरती रामदासा

ब्रम्हचर्य व्रत ज्याचे
रामरूप सृष्टी पाहे
कल्याण तिही लोकी समर्थ सद्गुरुपाय
आरती रामदासा
आरती रामदासा
भक्त विरक्त ईशा
उगवला ज्ञानसूर्य
उजळोनी प्रकाशा
आरती रामदासा

Chansons les plus populaires [artist_preposition] Anuradha Paudwal

Autres artistes de Film score