जाहले भजन

जाहले भजन आम्ही नमितो तव चरण
आम्ही नमितो तव चरण
वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण
आम्ही नमितो तव चरण
वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना

दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो
देवा तुजलाची ध्यातो
प्रेमे करुनिया देवा प्रेमे करुनिया देवा
गुण तुझेची गातो
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण
आम्ही नमितो तव चरण
वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना

तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना
देवा हेची वासना
रक्षुनियां सर्वां रक्षुनियां सर्वां
द्यावी आम्हासी आज्ञा
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण
आम्ही नमितो तव चरण
वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना

मागणे तेची देवा आता एकची आहे
देवा आता एकची आहे
तारुनियां सकळां तारुनियां सकळां
आम्हां कृपादृष्टी पाहे
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण
आम्ही नमितो तव चरण
वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना

जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया
ऐशा या ठाया
प्रेमानंदे लागू तुझी प्रेमानंदे लागू तुझी
कीर्ति वर्णाया
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण
आम्ही नमितो तव चरण
वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना

सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी
देवा आमुच्या मनी
हेची देवा तुम्हा हेची देवा तुम्हा
असे नित्य विनवणी
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण
आम्ही नमितो तव चरण
वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना

विर्दाळूनि अरिष्टे आता आमुची सारी आता
आमुची सारी देवा आमुची सारी
कृपेची साऊली देवा कृपेची साऊली देवा
दीनावरि करी
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण
आम्ही नमितो तव चरण
वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना

निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी
देवा तुम्हा असावी
आम्हां सर्वांची लज्जा आम्हां सर्वांची लज्जा
देवा तुम्ही रक्षावी
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण
आम्ही नमितो तव चरण
वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना

निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी

चुकले आमचे काही चुकले आमचे काही
त्याची क्षमा असावी
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण
आम्ही नमितो तव चरण
वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना

Chansons les plus populaires [artist_preposition] Anuradha Paudwal

Autres artistes de Film score