Vithobachi Aarti

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा
जय देव जय देव

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी
देव सुरवर नित्य येती भेटी गरूड हनुमंत पुढे उभे राहती
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा
जय देव जय देव

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवळिती राजा विठोबा सावळा
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा
जय देव जय देव

ओवाळू आरत्या कुर्वड्या येती
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती
दिंड्या पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा वर्णावा किती
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा
जय देव जय देव

आषाढी कार्तिकी भक्तजन येती हो साधू जन येती
चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती
केशवासी नामदेव भावे ओंवळिती
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा
जय देव जय देव

Chansons les plus populaires [artist_preposition] Anuradha Paudwal

Autres artistes de Film score