Commentary And Pail To Ge Kau Koktahe
भवतारकु अश्या काहोवनमालेच्या विरहाचा ताप तिला इतका असाह्य होतोय
कि ह्या उष्णतेचा शमन करण्यासाठी ह्या प्रसिद्ध वस्तू आहेत
त्या सर्व तिच्या बाबतीत गैरलागू आणि निरर्थक ठरल्या आहेत
चंद्र चांदणं चाफा चंदन सामान्यपणे ह्या उष्णतेचा परिहार करणाऱ्या गोष्टी
फुलं फुलांची शैय्या पण याचा काहीही तिच्याबाबतीत उपयोग होत नाही
चंद्र नाही चांदणं नाही चाफा नाही चंदनाची ओठीच नाही चंदनाची चोळी घातलेली आहे
तिने चोळी म्हटलेल्या जी अंगाला घट्ट चिटकून असते
परंतु चंदनाच्या चोळीने अंगाचा दहा शांत होण्या ऐवजी तिच्या सर्वांगाचा दाहा वाढलेला आहे
विश्रांती साठी सुमनांची शैय्या अंथरली परंतु तिला आगी सारखी ती पोळून टाकत आहे
आणि एरवी ज्या स्वरांनी आपल्या अंतर्कर्णाला आल्हाद होतो
त्या कोकिळेचा आवाज सुद्धा तिला ऐकवेनासा झालेला आहे
ज्या ज्या साधनांनी मनाचा ताप कमी होईल त्या त्या साधनांनी तिला तो वाढल्याचा
लक्षात येत चाल आहे तिचं बिचारीच दुर्दैव असा आहे
शेवटी ती आरस्या मध्ये पहिला जाते स्वतःच रूप स्वतःची आकृती
परंतु तिला स्वतःच रूप दिसतच नाही दर्पणी पाहता रूप न दिसे व
आपुले त्याही ठिकाणी तिला तिच्या कान्होवनमाळीचच रूप दिसत
त्याचा तिला इतका ध्यास लागलेला आहेकी ज्या मुळे तिचा स्वतःचा
अस्तित्व सुद्धा ती पार विसरून गेलेली आहे आणि त्याच्यातच अस्तित्वाशी
ती एकरूप झालेली आहे ती जी विरहाणेंचि वियोगाची जी परमवस्ता आहे
ती ज्ञानेश्वरांनी ह्या गीता मध्ये उत्कटपणे शब्दांकित केलेली आहे
अश्या अवस्थेमध्ये काही दिलासा देणाऱ्या गोष्टी येतात
एखाद्या दिवशी पहाटे पहाटे अंगणामध्ये कावळा दिसतो आणि त्याचा आवाज ऐकू येतो
सामान्य पणे कावळा हा काव्य मध्ये वर्ज मानलेल्या पक्षी काव्य मध्ये
भारद्वाज राजहंस कोकीळ मोर पोपट या पक्ष्यांचे स्थान असत
पण ज्ञानेश्वराने सुद्धा त्याला प्रेमाने आवतन देण्याचा कारण
लोकसाहित्यामध्ये कावळा हा माहेरचा दूत मानला गेलेला आहे
त्यामुळे सासुरवाणीशीला त्याचे आगमन हे अतिशय अशा दायक वाटतो
कुठला त्याने माहेरचा सांगावा आणला असेल अशी तिला आशा वाटते
ती त्या कवड्याच प्रेमाने स्वागत करते आणि त्याच्याशी सवांद करते
ती त्याला कावळा किंवा काक म्हणत नाही काऊ म्हणते
त्याच्या पावलांना ती पाव म्हणत नाय पाऊ म्हणते
तिने त्याचा आस लोभस्वरूप केलेलं आहे
जेणेकरून त्याच्याशी ममतेचे अनुबंध प्रस्तापित व्हावे
उड उड रे काऊ तुझे सोन्यानी मडवीन पाऊ तुझया पाऊलं मध्ये
जी पादत्रयान असतील ती मी सोन्यानी मढवून देईन परंतु पाहुणे
पांढरीराउ घराकडे येतील त्याची मला वार्ता अगोदर दे
त्याच्यासाठी ती उतावीळ झालेली आहे ती त्याला तरे तरे ची प्रलोभन दाखवते आहे
दहिंभाताची उंदीत्याच्या तोंडी लावण्याचा आमिष दाखवते आहे
दुधाची वाटी भरून त्याच्या ओठाला लावण्याचा प्रलोभन दाखवते आहे
आनी तो शकुंतिने त्याला सांगावा या साठी ती बिचारी आसुसलेली आहे
आ आ आ
पैल तो गे काऊ कोकताहे
पैल तो गे काऊ कोकताहे
शकुन गे माये सांगताहे
पैल तो गे काऊ कोकताहे
शकुन गे माये सांगताहे
पैल तो गे काऊ कोकताहे
उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाऊ
उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाऊ
पाहुणे पंढरीरावो घरा कें येती
पैल तो गे काऊ कोकताहे
शकुन गे माये सांगताहे
पैल तो गे काऊ कोकताहे
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी
जीवा पढिये तयाची गोडी सांग वेगी
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें ओठी
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी
पैल तो गे काऊ कोकताहे
शकुन गे माये सांगताहे
पैल तो गे काऊ कोकताहे
आंबिया डहाळी फळें चुंबी रसाळीं
आंबिया डहाळी फळें चुंबी रसाळीं
आजिचे रे काळीं शकुन सांगे
पैल तो गे काऊ कोकताहे
शकुन गे माये सांगताहे
पैल तो गे काऊ कोकताहे