Daiva Janile Kuni

G D Madgulkar, Vasant Desai

हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म
दैव जाणिले कुणी हो दैव जाणिले कुणी
लवांकुशाचा हलवी पाळणा
लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मीकी मुनी
हो दैव जाणिले कुणी

मृग सोन्याचा जगी असंभव
मृग सोन्याचा जगी असंभव तरीहि तयाला भुलले राघव
श्रीरामाला चकवून गेल्या
श्रीरामाला चकवून गेल्या शक्ती मायाविनी
हो दैव जाणिले कुणी
हो दैव जाणिले कुणी

आपद मस्तक विशुद्ध सीता पतिव्रता ती मूर्त देवता
पतितपावने तिला त्यागिली
पतितपावने तिला त्यागिली तशात ती गर्भिणी
हो दैव जाणिले कुणी
हो दैव जाणिले कुणी
आ आ आ

राजपुत्र जे नृपती उद्याचे शिशुपण त्यांचे दीनपणाचे
रत्नकंदुका जागी हाती
रत्नकंदुका जागी हाती मातीची खेळणी
हो दैव जाणिले कुणी
हो दैव जाणिले कुणी

Curiosités sur la chanson Daiva Janile Kuni de Lata Mangeshkar

Qui a composé la chanson “Daiva Janile Kuni” de Lata Mangeshkar?
La chanson “Daiva Janile Kuni” de Lata Mangeshkar a été composée par G D Madgulkar, Vasant Desai.

Chansons les plus populaires [artist_preposition] Lata Mangeshkar

Autres artistes de Film score