Maj Aavadale He Gaon

Vasant Pawar, G D Madgulkar

मज आवडले हे गाव
मज आवडले हे गाव
मज आवडले हे गाव
मज आवडले हे गाव

नदी वाहती घाट उतरते
नदी वाहती घाट उतरते
तीरावरती गोधन चरते
तीरावरती गोधन चरते
हिरवी मळई जळा चुंबिते
हिरवी मळई जळा चुंबिते
इकडून तिकडे तिकडून इकडे खेपा करिते नाव
मज आवडले हे गाव
मज आवडले हे गाव

चहु बाजूला निळसर डोंगर
चहु बाजूला निळसर डोंगर
मधे थिटुकले खेडे सुंदर
मधे थिटुकले खेडे सुंदर
निंब बाभळी अंबा उंबर
हलुनी डुलुनी सपर्ण फुलुनी करिती शीतळ छांव
मज आवडले हे गाव
मज आवडले हे गाव

घरे ठेंगणी वळत्या वाटा
घरे ठेंगणी वळत्या वाटा
चावडीपुढचा रुंद चव्हाटा
चावडीपुढचा रुंद चव्हाटा
राऊळ शिखरी उंच बावटा
भगव्या रंगे जगास सांगे वंश कुळाचे नाव
मज आवडले हे गाव
मज आवडले हे गाव
मज आवडले हे गाव आवडले हे गाव

Curiosités sur la chanson Maj Aavadale He Gaon de Lata Mangeshkar

Qui a composé la chanson “Maj Aavadale He Gaon” de Lata Mangeshkar?
La chanson “Maj Aavadale He Gaon” de Lata Mangeshkar a été composée par Vasant Pawar, G D Madgulkar.

Chansons les plus populaires [artist_preposition] Lata Mangeshkar

Autres artistes de Film score