Nijalya Tanhyavari
निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी
निजल्या तान्ह्यावरी
तिचा कलीजा पदरीं निजला
जीवापलीकडे जपे त्याजला
तिचा कलीजा पदरीं निजला
जीवापलीकडे जपे त्याजला
कुरवाळुनि चिमण्या राजाला
कुरवाळुनि चिमण्या राजाला
चुंबी वरचेवरी
निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी
निजल्या तान्ह्यावरी
सटवाई जोखादइ हसविती
खळी गोड गालांवरि पडती
सटवाई जोखादइ हसविती
खळी गोड गालांवरि पडती
त्याची स्वप्ने बघुनि मधुर तीं
त्याची स्वप्ने बघुनि मधुर तीं
कौतुकते अंतरीं
निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी
निजल्या तान्ह्यावरी
अशीच असशी त्रिभुवनजननी
बघत झोपल्या मज का वरुनी
अशीच असशी त्रिभुवनजननी
बघत झोपल्या मज का वरुनी
सुखदुःखांचीं स्वप्ने बघुनी
सुखदुःखांचीं स्वप्ने बघुनी
कौतुकशी का खरी
निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी
निजल्या तान्ह्यावरी