Majhya Mayecha Sonyavani Rang

Harendra Jadhav

माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग
माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

सरळ भागांमध्ये माणिक मोती
उद अग्रफुल खोप्यावरती
चंद्रकोर केवडा चांद
चंद्रकोर केवडा चांद
माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

उडी बुगडीवर भोकरपाळी
नथ नाकेची शोभे भारी
जिरे कपाळी मळवट बिंदू
जिरे कपाळी मळवट बिंदू
माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

शालू बुट्टेदर हिरवी चोळी
पदर भरजरी गोंडे भारी
पायी पैंजण झूम झूम नाद
पायी पैंजण झूम झूम नाद
माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

बेल पान वज्रटीक्का वरती सरी
चंद्र सूर्य हार केवडा भारी
मोहनमाळ वरती साज मोहनमाळ वरती साज
माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

गोठ पाटल्या तोडे छंद
कमरपट्याचा घुंगरू नाद
दंडे वाके बाजूबंद
दंडे वाके बाजूबंद
माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

आंबा शोभे सिंहासनी
शरण जाऊया सर्व मिळूनी
सौभाग्याचं जोगवा मागून
उदो उदो उदो अंबे गरजू ग
माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

माझ्या मायेचा सोन्यावाणी रंग
तिचा मोत्याने भरलाय भांग

Chansons les plus populaires [artist_preposition] Vaishali Samant

Autres artistes de Film score