गोंधळ [Original]

Shahir Sabale, Guru Thakur

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा... भवानीचा
हे लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा... भवानीचा
मी पणाचा दिमाख तुटला
अंतरंगी आवाज उठला
ऐरणीचा सवाल सुटला
या कहाणीचा..
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा... भवानीचा
हे लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
ओ इज तळपली, आग उसळली
ज्योत झळकली, आई गं…
या दिठीची काजळ काळी
रात सरली आई गं…
बंध विणला, भेद शिनला
भाव भिनला आई गं…
भर दुखांची आस जीवाला
रोज छळते आई गं…
हे माळ कवड्यांची घातली गं..
आग डोळ्यात दाटली गं..
कुंकवाचा भरून मळवट
या कपाळीला…
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा... भवानीचा
हे लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
आई राजा उधं उधं उधं..
उधं..उधं..
उधं..उधं..
उधं..उधं.. उधं..उधं..
तुळजापूर तुळजाभवानी आईचा
उधं..उधं..
उधं..उधं..
माहुरी गडी रेणुका देवीचा
उधं..उधं..
उधं..उधं..
आई अंबाबाईचा
उधं..उधं..
देवी सप्तशृंगीचा
उधं..उधं..
बा सकलकला अधिपती गणपती धाव
गोंधळाला याव
पंढरपूर वासिनी विठाई धाव
गोंधळाला यावं
हे गाज भजनाची येऊ दे गं
झांज सुजनाची वाजु दे गं
पत्थरातून फुटलं टाहो
या प्रपाताचा

Chansons les plus populaires [artist_preposition] अजय गोगवले

Autres artistes de Film score