Kali Dharti
हे काळी धरती नांगरलेली आली रं पेरणी
धावत ये रं काळ्या मेघा किरपा आता करी हा
हे काळी धरती नांगरलेली आली रं पेरणी
धावत ये रं काळ्या मेघा किरपा आता करी
चिंब होऊ दे धरनी
रान सारं आबादानी
जीव जळ खुळ्यावानी
देवा किरपा करी
धावत ये रं काळ्या मेघा किरपा आता करी हा
हिरवाईचं दान नेसलं रान भराला आज आलं जी
मिरुगाच्या नादानं केली पेरन जोमानं बरसू दे पानी
काळ्या आईची करनी तिला लेकराची माया
माय होईल हिरवी गान हिरीताच गाया
वरती आभाळाची हाये मला बापावानी छाया
साद माझ्या काळजाची न्हाई जायची रं वाया
माझ्या जीव्हाराचं सोन येऊ दे रं अवदाच्यानं
घाली पदरात दान देवा किरपा करी
धावत ये रं काळ्या मेघा किरपा आता करी
हिरवाईचं दान नेसलं रान भराला आज आलं जी
मिरुगाच्या नादानं केली पेरन जोमानं बरसू दे पानी
हे बीज रुजलं रुजलं माउलीच्या उदरात
माझं शिव्हार आवार आज आलंया भरात
सात जन्माची पुण्याई घातली तू पदरात
माय भरल्या खुशीनं गोडं हसते गालात
आलं डोळ्यामंदी पानी जीव झाला खुळ्यावानी
सारी तुझीच करणी देवा किरपा करी
धावत ये रं काळ्या मेघा किरपा आता करी