Maagu Kasa Mi
आ आ आ आ ओ ओ ओ
मागू कसा मी अन मागू कुणा
माझी व्यथा ही समजाऊ कुणा
हा मागू कसा मी अन मागू कुणा
माझी व्यथा ही समजाऊ कुणा
आहे उभा बघ दारी तुझ्या
जाणून घेरे जरा याचना
देशील का कधी झोळीत ह्या
तू दान माझे मला जीवना
मागू कसा मी अन मागू कुणा
झोळी रीती आहे जरी
आशा खुळी माझ्या उरी
झोळी रीती आहे जरी
आशा खुळी माझ्या उरी
आ्रता हो ह्या मनाचा आहे खरा
घाम होइ काळजाला दावू कुणा
मागू कसा मी अन मागू कुणा
शोधू कुठे माया तिची
तिचा लळा छाया तिची
शोधू कुठे माया तिची
तिचा लळा छाया तिची
मी भिकारी जीवनी ह्या आईविना
सोसवेना वेदना सांगू कुणा
मागू कसा मी अन मागू कुणा
माझी व्यथा ही समजाऊ कुणा
आ आ आ आ आ आ आ आ आ आ