Vaat Disu De
वाट दिसू दे गा देवा
वाट दिसू दे
वाट दिसू दे गा देवा
गाठ सुटू दे
वाट दिसू दे गा देवा
वाट दिसू दे
वाट दिसू दे गा देवा
गाठ सुटू दे
संग सोबतीची साथ
मग दिवा बित रात
आज पहाटच्या पावलाला
श्वास फुटू दे
वाट दिसू देगा देवा
वाट दिसू दे
वाट दिसू देगा देवा
गाठ सुटू दे
हिरव्या दाण्याचं दान दिलं त्यानं
वसाडाचं रान झालं जी
आरं मातीच्या पोटात आस्मानच बळ
माऊलीची लाज राख जी
या मिणमिणत्या दिव्याला तू साकड घाल
या तळमळत्या जीवाला दे जाणीव खोल
हे धगधगत्या निखाऱ्याला मायेची ओल
या रखरखत्या भुईला दे घामाचं मोल
केली निंदनी पेरणी
उधळून जिंदगानी
कुणब्याचं सारं रान
आबादान हसू दे
वाट दिसू देगा देवा
वाट दिसू दे
वाट दिसू देगा देवा
गाठ सुटू दे
भल्याची पुण्याई हुभी तुझ्या माग
जरा निगतीनं वाग जी
आरं ढळून इमान लागू नये डाग
दिल्या सबुदाला जाग जी
या सळसळत्या वादळाला आलं उधाण
या लखलखत्या आभाळाचं चांदण न्यारं
या रगरगत्या उन्हानं चेतवलं भान
हे कोसळत्या पावसाची अनादी काळ
मन शुद्ध निर्मळ, सत्वाचा परिमळ
या अरुपाचं रूप आरशात दिसू दे
वाट दिसू देगा देवा
वाट दिसू दे
वाट दिसू देगा देवा
गाठ सुटू दे
वाट दिसू देगा देवा
वाट दिसू दे
वाट दिसू देगा देवा
गाठ सुटू दे
संग सोबतीची साथ
मग दिवाभीत रात
आज पहाटंच्या पावलाला
श्वास फुटू दे
वाट दिसू दे
देवा, वाट दिसू दे
वाट दिसू दे
देवा, वाट दिसू दे