मौनातुनी
ये ना जरा आता पुन्हा डोळ्यांत वाचू कहाणी खरी
माझे तुझे नाते जणू ओळीत एका कादंबरी
थोडी शांतता धुक्याची
थोडी आर्तता सुखाची
इतके सांगणे तरीही
मौनातुनी ही वाट चालली पुढे पुढे
कोणातुनी हे मी तू चाललो पुन्हा कुणाकडे
माझे मन तुझे माझे क्षण तुझे माझ्या सोबती तू
माझ्या अंतरी आता राहशी माझ्या ऐवजी तू
दोघांतली उरली सुरली सरली दरी ही
माझे तुझे अवघे मी पण हलके अधांतरी
निघाले आता वेगळ्या दिशेला
तरीही आपल्या दिशेला
मौनातुनी ही वाट चालली पुढे पुढे
कोणातुनी हे मी तू चाललो पुन्हा कुणाकडे